धनशक्ती विरोधात जनशक्तीचा विजय झाला पाहिजे, महाविकास आघाडी उमेदवार शुभांगी पाटील यांची साद

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु असताना उमेदवार शुभांगी पाटील मतदानाचा हक्क बजावत असताना खोली क्रमांक चुकल्याने एकच गोंधळ उडाला. धुळे येथील मतदान केंद्रावर शुभांगी पाटील या गेल्या असता एकच गोंधळ उडाला.

    अहमदनगर – राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या नाशिकसह पाच जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या मतदारसंघातील सर्व उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. त्यामुळे विजय कोणाचा याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु असताना उमेदवार शुभांगी पाटील मतदानाचा हक्क बजावत असताना खोली क्रमांक चुकल्याने एकच गोंधळ उडाला. धुळे येथील मतदान केंद्रावर शुभांगी पाटील या गेल्या असता एकच गोंधळ उडाला. यावेळी उमेदवार शुभांगी पाटील या मतदानासाठी गेल्यानंतर खोली क्रमांक चुकल्याचे मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ दुरुस्ती करुन मतदान सुरळीत करण्यात आले.

    अधिकाऱ्यांचा घेतला समाचार
    यावेळी शुभांगी पाटील यांनी अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी शुभांगी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मी माझ्या भावाना आणि बहिणींना आव्हान करते की मी माझ्या शब्दावर पक्की आहे येणाऱ्या 2 फेब्रुवारी रोजी विजय झाल्याबरोबर आंदोलन करणार आहे. फक्त आज धनशक्ती विरोधात जनशक्ती चा विजय झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.