अपंग भाविकांची हेळसांड ! दिव्यांग भाविक चालत अन् व्हीआयपी भाविक रिक्षात

तुळजाभवानी मंदिर संस्थानकडे पाच इलेक्ट्रिकल रिक्षा असून, दिव्यांग आणि वृद्ध व्यक्तीपेक्षा व्हीआयपी भाविकांना जास्त सुविधा देण्यामध्येच हे रिक्षाचालक मग्न असतात.

  तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येतात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने यामध्ये अनेक भाविक हे दिव्यांग असतात तर अनेक भाविक वृद्ध देखील असतात. त्यामुळे दिव्यांग आणि वृद्ध भाविकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने आणि मंदिर सुरक्षेतेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांचे अध्यक्ष यांनी भवानी रोडवरील गेटपासून खाजगी वाहने बंद केली आहेत. त्यामध्ये रिक्षे देखील बंद आहेत अशा परिस्थितीमध्ये भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर संस्थांच्या वतीने अशा दिव्यांग वृद्ध भाविकांना मंदिर महाद्वारपासून गेट पर्यंत सोडण्यासाठी मोफत रिक्षे सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

  भवानी रोडवरील जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहन बंदी या निर्णयामुळे वाहनमुक्त रस्ता होऊन भाविक बिनधास्त आणि न घाबरता या रस्त्याने वावरतात तर लहान मुलं देखील वाहनाची भिती न ठेवता बिनधास्त फिरतात या रस्त्याला वाहन नसल्यामुळे भाविकांची संख्या वाढली असून, त्यामुळे व्यापारपेठा देखील पहिल्यापेक्षा चांगल्याच गजबजलेल्या दिसतात.

  तुळजाभवानी मंदिर संस्थान कडे पाच इलेक्ट्रिकल रिक्षा असून त्यामधील एक रिक्षा हा मंदिर संस्थानच्या सैनिकी विद्यालयाला देण्यात आला आहे तर या पाच रिक्षांवर दोन शिफ्ट मध्ये साधारण दहा ड्रायव्हर ठेवण्यात आले आहेत. चार रिक्षा उपलब्ध असताना देखील दिव्यांग आणि वृद्ध भाविकांना चालत जावे लागत आहे तर हे रिक्षा चालक व्हीआयपी भाविकांना गेट ते महाद्वारपर्यंत सोडण्याचे काम करतात. दिव्यांग आणि वृद्ध व्यक्तीपेक्षा व्हीआयपी भाविकांना जास्त सुविधा देण्यामध्येच हे रिक्षाचालक मग्न असतात. व्हीआयपी भाविकांकडून टीप दिली जाते तर दिव्यांग आणि वृद्ध व्यक्तीकडून काहीही मिळत नसल्याने त्यांना टाळाटाळ करण्याचे काम हे रिक्षाचालक करतात.

  तसेच रिक्षाचालक भाविकांकडून पैसे देखील घेतात, अशी चर्चा शहरवासीयांमधून मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. मंदिर संस्थांननी भाविकांची लूट करणाऱ्या आणि दिव्यांग व्यक्तींची गैरसोय करणाऱ्या रिक्षा चालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाविक भक्तांसह शहरवासीयांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे.

  काचेवर मोफत सुविधा हा शब्द लिहावा

  या इलेक्ट्रिकल रिक्षांवर मंदिर संस्थांचे नाव असून दिव्यांग भाविकांसाठी मोफत रिक्षा सुविधा असे स्पष्ट लिहिलेले असताना देखील भाविकांची लूट होते हे आश्चर्यजनक आहे. मंदिर संस्थांच्या वतीने या रिक्षांच्या समोरील काचावर मोठ्या आणि ठळक अक्षरात मोफत सुविधा हा शब्द टाकून घ्यावा. तसेच भाविकांना आवाहान करणारे शब्द म्हणजे रिक्षा चालकांनी पैशाची मागणी केल्यास मंदिर संस्थानकडे तक्रार करावी, असे रिक्षात बसणाऱ्या भाविकांना दिसेल असे ठळक अक्षरात लिहिण्यात यावे, जेणेकरून भाविकांची लूट होणार नाही.

  …तरचं गरजूवंत भाविकांना लाभ मिळेल

  जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थेचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांनी दिव्यांग भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून रिक्षा चालकांना वेगळे मोबाईल नंबर दिले आहेत. आणि मंदिर महाद्वारजवळ आणि भवानी रोडवरील गेट जवळ या रिक्षाचालकांचे नंबराचे फलक लावलेले आहेत. मंदिर संस्थांच्या वतीने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून चांगले नियोजन केले असले तरी कर्मचारी अंमलबजावणी व्यवस्थित करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होते त्यासाठी मंदिर संस्थानच्या वतीने विशिष्ट समिती स्थापन करून चांगल्या पद्धतीने केलेली भाविकांच्या सोयी सुविधाचा लाभ गरजूवंत भाविकांना मिळेल