12 आणि 13 ऑगस्टला दिसणार प्रकाशोत्सव; जाणून घ्या नेमकं होणार तरी काय?

अवकाशप्रेमींसाठी यंदा पावसाळ्यातील दिवाळीच ठरणार आहे. कारण अवकाशात पूर्व क्षितिजावर नयनरम्य खगोलीय घटना घडणार आहे. पूर्व क्षितिजावर उल्का वर्षाव होणार आहे. त्यामुळे ही घटना अवकाशप्रेमींसाठी दिवाळी समान ठरणार आहे.

    अकोला : अवकाशप्रेमींसाठी यंदा पावसाळ्यातील दिवाळीच ठरणार आहे. कारण अवकाशात पूर्व क्षितिजावर नयनरम्य खगोलीय घटना घडणार आहे. पूर्व क्षितिजावर उल्का वर्षाव होणार आहे. त्यामुळे ही घटना अवकाशप्रेमींसाठी दिवाळी समान ठरणार आहे. याबाबतची माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली.

    12 आणि 13 ऑगस्ट या दोन दिवसात हे बदल दिसणार आहेत. आकाशात विविधरंगी रोषणाई स्विफ्ट टटल या धूमकेतूंच्या अवशेषातून बघता येईल. हा विविधरंगी प्रकाश उत्सव मध्यरात्रीनंतर पूर्व क्षितिजावर ययाती या तारका समूहातून आरंभ होईल. याचवेळी गुरु ग्रह आकाश मध्याशी सोबतीला असेल. ताशी 60 ते 100 उल्कांचे दर्शन यावेळी होणार असल्याचा अंदाज आहे. सर्वसाधारण दर ताशी 60 ते 100 या प्रमाणात उल्का तुटताना दिसतील, असाही अंदाज आहे.

    दरम्यान, अवकाशात येऊन गेलेले धुमकेतू लघुग्रह आदींचे तुकडे पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षणामुळे खेचल्याने वातावरणात पेट घेतात, अशा उल्का अधूनमधून आकाशातून पृथ्वीवर येताना दिसतात.