
केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. साखर कारखानदार व विज कंपन्या शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहे. हे खपवून घेणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने याचा जाब विचारू . केंद्रात पेशवाई आणि राज्यात सरंजामदारी आली आहे, अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
कडेगाव / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. साखर कारखानदार व विज कंपन्या शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहे. हे खपवून घेणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने याचा जाब विचारू . केंद्रात पेशवाई आणि राज्यात सरंजामदारी आली आहे, अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मगावाहून यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ‘ हुंकार बळीराजा ‘ यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हाध्यक्ष महेश खराडे, कार्याध्यक्ष संदीप राजोबा, पोपटराव मोरे प्रमुख उपस्थित होते.
खासदार शेट्टी म्हणाले, आम्ही काय बैल आहोत का या भाषेत राज्यकर्त्याना सुनावले. शेतकऱ्याना आठ तास वीज व इतराना चोवीस तास विज असा दुजाभाव सरकार करीत आहे. महाराष्ट्रात विज दर जादा इतर राज्यात कमी तरी सरकारने याचा अभ्यास करावा. महाविकास आघाडीचा दळभद्री कारभार आहे.
ते म्हणाले, यशवंतरावांचे खरे वारसदार आम्ही आहोत त्यांच्या विचार आम्ही जपत आहोत. शरद पवार कारखानदारांचे नेते आहेत. कृषिमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हित जपले नाही. महाविकास आघाडी दळभद्री कारभार करीत आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण जपले जात नाही. शेतकऱ्यांना दिवसा विज दिली जात नाही. रात्रीची विज पुरवठा केला जात आहे. विज बिल अव्वाच्या सव्वा दिली जात आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुंबई, दिल्लीत बसलेले सरकार लक्ष देत नाही. दिवसा विज मिळण्यासाठी व शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी ग्रामसभेत ठराव घ्या. येणारा हंगाम शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी दिली नाही तर कारखाने सुरु करू देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
महेश खराडे , संदीप राजोबा , शमुध्दीन संदे, बळराम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन झाले. सौरभ शेट्टी, रामदास महिंद, भीमराव होनमाने, बळाराम पाटील यांच्या सह स्वाभिमानीचे कार्यकर्ते शेतकरी होते. बाबासाहेब महिंद यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
‘हुंकार बळिराजा’ यात्रेतील महत्त्वाचे मुद्दे :
शेतीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा करा.
शेतमालाला हमी भाव कायदा करावा , यासाठी देशभरातील ३०० संघटना एकत्रित करणार.
एफआरपी प्रमाणे ऊसबील अदा करा.
ऊसतोडीसाठी जादा पैसे घेणाऱ्यांच्या विरोधात साखर आयुक्तालयाकडे तक्रार.