Umesh Kolhe Murder Case 14 days judicial custody to all seven accused nrvb

दुसऱ्यदिवशी १७ मे रोजी यादव यांना बिकेसी येथून राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात येत असल्याचा एसएमएस नातेवाईकांना प्राप्त झाला. मुलाला दुसऱ्या रुग्णालयात हलविल्याने व रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाला असून बिकेसी जम्बो कोविड सेंटरचे अधिष्ठता डॉ. राजेश डेरे आणि अन्य संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत सुनीलकुमार यांचे वडील रामाशंकर यांनी अँड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

   

  मुंबई – कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यानंतरही त्याच व्यक्तीला उपचारासाठी दुसऱ्य़ा रुग्णालयात नेण्यात येत असल्याचा एसएमएस बीकेसीतील जंम्बो कोविड सेंटरकडून पाठविण्यात आला. प्रशासनाच्या याच निष्काळजीपणामुळे आपल्या व्यक्तींचा जीव गेल्याचा आरोप करत मृत व्यक्तींच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. मात्र, खंडपीठाने त्यांची याचिका ऐकण्यास नकार देत याचिकाकर्त्यांना अन्य खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले.

  कोविडमुळे मृत्यू
  विधी शाखेत शिक्षण घेतलेल्या तसेच एम. आरची नोकरी करणाऱ्या सुनीलकुमार यादव यांना कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आणि त्यांना २ मे २०२१ रोजी बिकेसीतील जम्बो कोविड सेंटर मध्ये दाखल केले. त्यानंतर त्यांना १५ मे रोजी त्यांना घाटकोपरच्या राजाबाई रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, १६ मे रोजी सुनीलकुमार यांचे निधन झाले. मृत्यूबाबत सकाळी त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. नातेवाईकांनी मृतदेहावर त्याच दिवशी अग्निसंस्कार केले.

  नुकसानभरपाईची मागणी
  मात्र, दुसऱ्यदिवशी १७ मे रोजी यादव यांना बिकेसी येथून राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात येत असल्याचा एसएमएस नातेवाईकांना प्राप्त झाला. मुलाला दुसऱ्या रुग्णालयात हलविल्याने व रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाला असून बिकेसी जम्बो कोविड सेंटरचे अधिष्ठता डॉ. राजेश डेरे आणि अन्य संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत सुनीलकुमार यांचे वडील रामाशंकर यांनी अँड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यादव हे घरातील एकमेव कमावते असल्याने त्यांच्यापश्चात कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना भरपाईची देण्यात यावी, अशी मागणीही याचिकेतून केली आहे. या याचिकेवर न्या.प्रसन्न वराळे आणि न्या. किशोर संत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. मात्र खंडपीठाने सुनावणी घेण्यास नकार देत अन्य खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले.