नवी मुंबईतील PFI च्या कार्यालयातील होर्डिंग्ज हटवण्यात आले

एफआय आणि त्याच्याशी संलग्न संघटना बेकायदेशीर कारवाया करत होत्या. या कारवाया देशाच्या सुरक्षा आणि अखंडतेसाठी धोकादायक आहेत. या संघटनांच्या कारवाया देशाच्या शांतता आणि धार्मिक सौहार्दाला धोका निर्माण करू शकतात. असं सांगण्यात आलं आहे.

    पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) ही संघटना बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करून केंद्र सरकारने पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने (Central Home Ministry) जारी केलेल्या अध्यादेशात माहिती देण्यात आली आहे. आता या प्रकरणी राज्यात कारवाईला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईतील PFI च्या कार्यालयातील आज होर्डिंग्ज हटवण्यात आले आहेत.  या वेळी माेठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

    PFI च्या विध्वंसक कारवाया पाहता सरकारने ही बंदी घातली आहे. कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा इतर कोणत्याही घटकाविरुद्ध देशविरोधी किंवा दहशतवादी कारवायांमध्ये (Terrorist Activities) सामील असल्याचा पुरावा आढळला, तर ती व्यक्ती, संस्था किंवा इतर घटकांवर केंद्र सरकार निर्बंध (Restrictions) लादू शकते. असं सांगण्यात आलं आहे.