पी.एच.डी प्राप्त प्राध्यापकांनी गौरीशंकर फार्मसीचा नावलौकिक वाढविला – श्रीरंग काटेकर

महाविद्यालयाच्या सेवेत 11 पी.एच.डी प्राध्यापकांचा समावेश ,विद्यार्थ्यांची महाविद्यालयास सर्वाधिक पसंती

  लिंब : औषधनिर्माण शास्त्र शाखेतील दर्जात्मक व गुणात्मक शिक्षणाचा ध्यास घेऊन वाटचाल करणाऱ्या गौरीशंकर फार्मसी मधील उच्चशिक्षित प्राध्यापकांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उंचावून ज्ञानक्षेत्रात नावलौकिक वाढविला असल्याचे मत गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले.

  ते गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्या प्राध्यापकांच्या उत्तुंग कामगिरीबद्दल आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.

  यावेळी सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव चे प्राचार्य डॉ.नागेश आलूरकर, उपप्राचार्य डॉ. जयप्रकाश सूर्यवंशी ,डॉ. सुरेश सुङके, डॉ. कैलास कारंडे, डॉ.अविनाश भोसले ,गौरीशंकर इन्स्टिट्यूट आॅफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅन्ङ रिसर्च लिंबचे प्राचार्य डॉ.अजितकुलकर्णी ,उपप्राचार्य डॉ. योगेश गुरव, डॉ. राहुल जाधव ,डॉ. संतोष बेल्हेकर ,डॉ. भूषण पवार ,डॉ. महेश थोरात आदी प्रमुख उपस्थित होते.

  श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की, दर्जात्मक शिक्षणाने विद्यार्थी घडवण्यासाठी उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापकाची खरी गरज आहे ही गरज ओळखून संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप यांनी उच्चशिक्षित प्राध्यापकांना महाविद्यालयात सेवेची संधी दिली आहे.

  डॉ.अजित कुलकर्णी म्हणाले की उच्चशिक्षित प्राध्यापक सेवेत असल्याने महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उंचविला आहे विद्यार्थ्यांच्या सवार्गिण प्रगतीच्या दृष्टीने ते पूरक ठरत आहे.

  डॉ. नागेश आलूरकर म्हणाले की औषध निर्माणशास्त्र शाखेत नाविन्यपूर्ण बदल घडत आहेत त्यासाठी तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांची खरी गरज आहे गौरीशंकर फार्मसीमध्ये सर्वाधिक पी.एच.डी प्राप्त प्राध्यापक असल्याने याचा लाभ विघार्थ्याना होत आहे.

  गौरीशंकर फार्मसीमध्ये सर्वाधिक पी.एच.ङी प्राध्यापकाचा बहुमान

  गौरीशंकर फार्मसी मध्ये सर्वाधिक पी.एच.डी प्राप्त प्राध्यापकांची संख्या आहे संस्थेच्या दृष्टीने हा खरा बहुमान आहे उच्चशिक्षित प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या सवार्गिण प्रगतीसाठी मोलाचे योगदान देत आहेत तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत याचा लाभ विद्यार्थ्यांना होत आहे. प्रास्ताविक व आभार डॉ. योगेश गुरव यांनी केले