महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील फोन टॅपिंग प्रकरण बंद; न्यायालयाने स्वीकारला सीबीआयचा रिपोर्ट

महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) नेत्यांचे 2021 मध्ये बेकायदा फोन टॅपिंग केल्याच्या आरोप करण्यात आला. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास बंद करण्याची मागणी करणारा सीबीआयचा अहवाल (CBI Report) महानगर दंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी स्वीकारला आहे.

    मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) नेत्यांचे 2021 मध्ये बेकायदा फोन टॅपिंग केल्याच्या आरोप करण्यात आला. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास बंद करण्याची मागणी करणारा सीबीआयचा अहवाल (CBI Report) महानगर दंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी स्वीकारला आहे. त्यामुळे आता फोन टॅपिंग प्रकरण (Phone Tapping Case) बंद झाले आहे.

    राज्य गुप्तचर विभागाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या त्यावेळी त्यांनी राजकीय नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बेकायदा फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पोलीस खात्यातील बदल्यांमध्ये कथित भ्रष्टाचाराबाबत लिहिलेल्या पत्राचा हवाला फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिला होता.

    दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास बंद करण्याबाबतचा अहवाल महानगरदंडाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. अखेर हा अहवाल स्वीकारण्यात आला असून, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील फोन टॅपिंग प्रकरण बंद करण्यात आले आहे.