बँकेच्या नोटीसवर शहाजहानचे छायाचित्र ; हुपरीतील संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची कार्यालयासमाेर घोषणाबाजी

हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे बँकींग क्षेत्रात राज्यात अग्रेसर असलेल्या एच.डी.एफ.सी बँकेच्या नोटीस व स्टेटमेंटवर मुघलसम्राट शहाजहानचे छायाचित्र असल्याचे काही सभासदांच्या निदर्शनास आले.हिंदूचा अमानुष छळ करणाऱ्या मुघलसम्राटाचे छायाचित्र बँकेच्या नोटीस व स्टेटमेंटवर असल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्ते संतप्त झाले.

    हुपरी : हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे बँकींग क्षेत्रात राज्यात अग्रेसर असलेल्या एच.डी.एफ.सी बँकेच्या नोटीस व स्टेटमेंटवर मुघलसम्राट शहाजहानचे छायाचित्र असल्याचे काही सभासदांच्या निदर्शनास आले.हिंदूचा अमानुष छळ करणाऱ्या मुघलसम्राटाचे छायाचित्र बँकेच्या नोटीस व स्टेटमेंटवर असल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्ते संतप्त झाले. सदरच्या घटनेने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बँक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तत्काळ मुघलसम्राट शहाजहानचे छायाचित्र हाटवावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

    मुघलसम्राट शहाजहान याने मुघल काळात सर्वच हिंदू बांधवावर अत्याचार करुन अमानुष छळ केल्याचा इतिहास आहे.असे असताना देशासह राज्यात अग्रेसर असलेल्या एच.डी.एफ.सी बँकेच्या नोटीस व स्टेटमेंटवर मुघलसम्राट शहाजहानचे छायाचित्र येतेच कसे हा संशोधनाचा विषय असून संबंधित बँकेने नोटीस व स्टेटमेंटवर असलेले शहाजहानचे छायाचित्र तत्काळ हाटवावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
    दरम्यान बँकेच्या अधिकाऱ्यांनी सदरच्या छायाचित्राबाबत कोणतीही कल्पना आम्हाला नाही.याबाबत बँकेच्या मुख्य शाखेला तत्काळ ईमेलद्वारे माहिती दिली असल्याचे सांगितले.

    या निवेदनावर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे शहरमंत्री अभिजित माने,शहर सहमंत्री अभिनंदन माणकापूरे,शहर संयोजक सागर मेथे,युवराज खराडे,संदीप पवार,नितीन काकडे,रवी गायकवाड,किरण पाटील आदीसह शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.