
एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार (Crime in Nashik) केले. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की १ सप्टेंबर २०२० ते १६ ऑगस्ट २०२३ या तीन वर्षांच्या कालावधीत एका आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखविले.
नाशिक : एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार (Crime in Nashik) केले. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की १ सप्टेंबर २०२० ते १६ ऑगस्ट २०२३ या तीन वर्षांच्या कालावधीत एका आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखविले.
या काळात आरोपीने तिच्या राहत्या घरी, त्याच्या घरी, निफाड, त्र्यंबकेश्वर, नाशिकरोड अशा विविध ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. नंतर त्याच्या नातेवाईकांनी शिवीगाळ व दमदाटी करत तिला मारहाण केली.
पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीसह त्याच्या नातेवाईकांवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक हांडोरे करत आहेत.