प्रेम संबंधातून शारिरीक संबंध, नंतर ब्लॅकमेल करून शोषण; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस

प्रेम संबंधाचा गैरफायदा घेऊन शारिरीक संबंध प्रस्थापित केले अन् त्यानंतर ब्लॅकमेल करून २६ वर्षीय विवाहितेवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

    पुणे : प्रेम संबंधाचा गैरफायदा घेऊन शारिरीक संबंध प्रस्थापित केले अन् त्यानंतर ब्लॅकमेल करून २६ वर्षीय विवाहितेवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याने पतीला देखील मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी हेमंत संजय वैराट असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका २६ वर्षीय विवाहित महिलेने दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    हेमंतने पिडीत तरुणीशी प्रेम संबंध निर्माण केले. त्याचा गैरफायदा घेत पतीला ठार मारण्याची धमकी दिली. त्यांना भेटण्यास बोलवत जबरदस्तीने शरीर संबंध प्रस्थापित केले. त्याचे फोटो मोबाईलमध्ये काढून घेतले. पण, विवाहितेने भेटण्यास नकार दिल्यानंतर हे फोटो तिच्या पतीला दाखवण्याची धमकी दिली.

    तसेच वारंवार शरीर संबंध ठेवले. विवाहितेने फोन न उचलल्याने तिच्या घरी जाऊन माझा फोन का उचलत नाही मला भेटायला न आल्यास मी काय करायचे ते बघतो असे म्हणत धमकी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.