शिवसेना जिल्हाप्रमुखांचेच मारले पाकीट; ओबीसी मेळाव्यात घडला प्रकार

सांगलीमध्ये शनिवारी (दि.२६) ओबीसी मेळावा आयोजित केला होता. याच मेळाव्यात सांगली शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांचे पाकीट मारून, चोरट्याने ५० हजार पळवले असल्याची घटना समोर आली आहे. 

    सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सांगलीमध्ये शनिवारी (दि.२६) ओबीसी मेळावा आयोजित केला होता. याच मेळाव्यात सांगली शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांचे पाकीट मारून, चोरट्याने ५० हजार पळवले असल्याची घटना समोर आली आहे.

    सांगलीत शनिवारी ओबीसी मेळावा पार पडला. या मेळाव्याला मंत्री विजय वडेट्टीवार आणि अनेक नेत्यांची यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते यांचा सत्कार करत असताना एका भुरट्या चोरांनी त्यांच्या खिशातील पाकीट लंपास केले. चक्क स्टेजवर येऊन पन्नास हजार रुपये चोरट्याने चोरले. त्या चोरट्याचा व्हिडिओ हा व्हायरल झाला आहे. चोरीप्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.