मांसाहाराच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी, जैन संस्थांकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल

सार्वजनिक ठिकाणी आणि धार्मिक स्थळांशेजारी करण्यात येणाऱ्या जाहिरांतीसह टिव्ही आणि सर्व प्रकारच्या मीडियावर करण्यात येणाऱ्या मांसाहाराच्या जाहिरांतीवर बंदी आणण्यात यावी असं या याचिकेच म्हणण्यात आलं आहे.

    मुंबई : मांसाहाराच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची याचिका काही जैन संस्थांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. लोकांच्या शांततेत जगण्याच्या मुलभूत अधिकारावर गदा येत असल्याचा आरोप करत मांसाहाराच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एका याचिका दाखल करण्यात आली असून, या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.

    श्री ट्रस्टी आत्म कमल लब्धीसुरीश्वरजी जैन ज्ञानमंदिर ट्रस्ट, सेठ मोतीशा धर्मादाय ट्रस्ट आणि श्री वर्धमान परिवार आणि ज्योतींद्र शाह यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि धार्मिक स्थळांशेजारी करण्यात येणाऱ्या जाहिरांतीसह टिव्ही आणि सर्व प्रकारच्या मीडियावर करण्यात येणाऱ्या मांसाहाराच्या जाहिरांतीवर बंदी आणण्यात यावी असं या याचिकेच म्हणण्यात आलं आहे. या जाहीरातींमुळे मांसविक्रेते हे प्राणी पक्षांच्या हत्येला प्रोत्साहन देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.