पिंपरी चिंचवडचा दहावीचा निकाल 97.73 टक्के…

पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९७.७३ टक्के लागला असून निकालात २.१९ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. यंदा ऑफलाइन परीक्षा झाल्यामुळे निकालाविषयी उत्कंठा दाटली होती.  मुलांचा निकाल ९७.१७ टक्के तर मुलींचा निकाल ९८.३९ टक्के लागला आहे. पुर्नपरीक्षार्थ्यांचा ४९.५२ टक्के निकाल लागला आहे. तब्बल १२४ शाळांनी निकालाची शंभरी गाठली आहे.

  पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९७.७३ टक्के लागला असून निकालात २.१९ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. यंदा ऑफलाइन परीक्षा झाल्यामुळे निकालाविषयी उत्कंठा दाटली होती.  मुलांचा निकाल ९७.१७ टक्के तर मुलींचा निकाल ९८.३९ टक्के लागला आहे. पुर्नपरीक्षार्थ्यांचा ४९.५२ टक्के निकाल लागला आहे. तब्बल १२४ शाळांनी निकालाची शंभरी गाठली आहे.

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या वतीने मार्च २०२२ मध्ये घेतल्याला दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला. यामध्ये शहरात दहावीच्या परीक्षेला १८८ शाळांमधून एकूण १९६७४ विद्यार्थी बसले होते. यामध्ये १०६१६ मुले व ८९७८ मुली परीक्षेस बसल्या होत्या. त्यातून १०३१६ मुले व ८८३४ मुली उत्तीर्ण झाल्या. एकूण १९१५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

  निकाल ऐकताच चांगल्या गुणांनी पास झालेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद तरळला. सर्वांनी सोशल मीडियावर पेढे भरवितानाचे फोटो शेअर केले. मित्र-मैत्रिणींनी लगेचच एकमेकांना फोन करून शुभेच्छा दिल्या. नातेवाईकांनी व्हिीडीओ कॉल केले. सोशल मीडियावर शुभेच्छांचा धुमाकूळ दिसून आला. बऱ्याच जणांनी सेल्फी काढून आनंद व्यक्त केला.

  शहराचा निकाल घटला 

  गतवर्षी शहराचा निकाल ९९.९२ टक्के लागला होता. त्यामुळे यंदा निकालात २.१९ टक्‍क्‍यांनी घट झाल्याचे दिसले. मुले ९७. १७ टक्के व ९८. ३९ टक्‍के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

  रिपीटर  ४९.५२ टक्के मुले पास शहरात

  ४२३ पुर्नपरीक्षार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी ३०० मुले तर १२३ मुली होत्या. यातर ४२२ पुर्नपरीक्षार्थ्यांनी दिली. त्यापैकी २०९ पुर्नपरीक्षार्थ्यांनी यश मिळविले आहे. यापैकी १५२ मुले व ५७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुले ५०.८३ टक्के व ४६.३४ टक्‍के मुलींची टक्केवारी आहे.

  महापालिका शाळेचे घवघवीत यश 

  पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या १८ माध्यमिक शाळांचा ९१.०९टक्के निकाल लागला आहे. मुले-मुलींनी यंदा गुणांमध्ये चांगलीच आघाडी मारली.  पिंपरी आणि क्रीडाप्रबोधिनी शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. तर सर्वाधिक कमी रूपीनगर शाळेचा ७१.३०टक्के निकाल लागला आहे.

  सेल्फी आणि स्टेटस 

  दुपारी निकाल पाहिल्यानंतर पास झालेल्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला, तर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या पोस्ट दिवसभर पाहायला मिळाल्या. काही विद्यार्थ्यांनी सेल्फी काढत सेलिब्रेशन करून, निकालाचा आनंद घेतला. तर निकालाचे स्टेटस अनेकांच्या मोबाईल क्रमांकावर झळकत होते.