खंडणी मागणाऱ्याला अटक

व्हाट्सअप मॅसेजवरून  १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक व गुन्हे शाखा ४ यांनी २४ तासाच्या आत गजाआड केले आहे.

    पिंपरी : व्हाट्सअप मॅसेजवरून  १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक व गुन्हे शाखा ४ यांनी २४ तासाच्या आत गजाआड केले आहे. गणेशकुमार मुन्शी महतो (वय २०, रा. सध्या निघोज बेंडाळे वस्ती ता. खेड. जि. पुणे, मुळगाव- सलग, सायाळ, हजारीबाग झारखंड) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालिदास बबन शिंदे (वय ३६, रा. खालुंब्रे, खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्नुसार आरोपीने १३ नोव्हेंबर रोजी शिंदे यांना व्हॉटसअप मॅसेज करून तुला व तुझ्या कुटुंबाला मारून टाकीन, पोकलेन चे मशीन जाळून टाकीन, हे नको असेल तर मला १० लाख रुपये दे, अशी खंडणी मागितली होती.

    या तक्रारीचा तपास करत पोलिसानी तांत्रिक तपास सुरु केला. यावेळी बातमीदार द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, मॅसेज करणारा इसम निष्पन्न झाला असून तो बेंडाळे येथील अतिथी हॉटेल जवळ थांबला आहे. पोलिसांनी तेथे जात त्याला शिताफीने ताब्यात घेतले. यावेळी त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला माबोईल जप्त केला. याचा पुढील तपास महाळुंगे पोलीस करत आहेत.