नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात अननस महागले; आवक घटल्याने 15 ते 20 रुपयांनी दरवाढ

नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात केरळ वरून येणाऱ्या अननसाच्या किंमतीत वाढ झाली आहे. पूर्वीच्या दरापेक्षा अननस 15 ते 20 रुपयांनी महाग झाले असून, या स्थितीला किलोला 40 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. 

    नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात केरळ वरून येणाऱ्या अननसाच्या किंमतीत वाढ झाली आहे. पूर्वीच्या दरापेक्षा अननस 15 ते 20 रुपयांनी महाग झाले असून, या स्थितीला किलोला 40 रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

    पूर्वी 40 ते 50 गाड्यांची आवक होती ती आज स्थितीला 15 ते 20 गाड्यांवर आल्याने दरात वाढ झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. पुढील काळात दरात फरक पडणार नसल्याचेही व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र जरी दर वाढले असले तरी अननसाला ग्राहकांची मागणी स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.