This wait is dangerous; As many as 20 vehicles collided with each other due to thick fog, injuring 15 people

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत असला तरी चिंता करू नका, या पावसामुळे तुमच्या दिवाळी सणाच्या आनंदावर पाणी फिरण्याची अजिबात शक्यता नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाने ही माहिती दिली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शुक्रवारपर्यंत (दि. १०) कोकण व दक्षिण महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    पुणे : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत असला तरी चिंता करू नका, या पावसामुळे तुमच्या दिवाळी सणाच्या आनंदावर पाणी फिरण्याची अजिबात शक्यता नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाने ही माहिती दिली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शुक्रवारपर्यंत (दि. १०) कोकण व दक्षिण महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारनंतर (दि. ११) मात्र राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीत गुलाबी थंडी व धुक्याचा अनुभवही घेता येणार आहे.

    अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात बुधवारी (दि. ८) दक्षिण कोकणात अर्थात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत हलका ते मध्यम ते स्वरूपाचा पाऊस झाला. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्राच्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर तसेच पुण्याच्या काही भागातही हलका स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, अरबी समुद्रातील हे कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू निवळत असून शनिवारनंतर (दि. ११) राज्यातील हवामान पूर्णपणे निरभ्र होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.