पैठण- संभाजीनगर महामार्गावर पाईपलाईन पुन्हा फुटली; रस्त्यावर पाणीच पाणी

सोमवारी पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पिंपळवाडी जवळ रस्ताचे काम चालू असताना पुन्हा जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे.

    छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरावरील पाणीटंचाईचे विघ्न कायम असून, या पंधरा दिवसांपासून दररोज कुठे ना कुठे पाईपलाईन फुटत असल्याचे चित्र आहे. सोमवारी पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पिंपळवाडी जवळ रस्ताचे काम चालू असताना पुन्हा जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे.

    दरम्यान यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पाईपलाईन फुटल्याने शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा पुढे ढकलायची वेळ येणार आहे. काही भागांत तर दहा ते बारा दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने नागरिकांवर ‘पाणी पाणी’ करण्याची वेळ आली आहे.

    छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जर फुटली तर या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. यावर प्रशासन गुन्हे दाखल करणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.