rain

येत्या ४-५ दिवसांत दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची (Maharashtra Monsoon Update) शक्यता आहे.

    मुंबई: उकाड्यामुळे हैराण झाल्याने सगळे जण पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत. सोमवारी अंदमानात मान्सूनचं (Monsoon Update) आगमन झालं आहे. तब्बल ६ दिवस आधीच मान्सून अंदमानात धडकल्याने महाराष्ट्राला (Maharashtra Monsoon Update) दिलासा मिळाला आहे. राज्यात वरुणराजाचं (Rain Update) लवकर आगमन होणार आहे.

    येत्या ४-५ दिवसांत दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

    कालच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. तर २७ मे रोजी तो केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीसह राज्यातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढच्या दोन दिवसात केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.