Shots fired at Korean national's house in Pune
Shots fired at Korean nationals house in Pune

  पुणे : ओळखीतील मुलाला मारहाण होत असल्याने भांडणामध्ये पडलेल्या तरुणाला मारहाण करीत त्याच्यावर पिस्तूल रोखून तसेच पिस्तुलाच्या उलट्या बाजूने मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली.

  सिध्दार्थ शावळकर (वय २०, रा. केशवनगर), राहुल धावारे (वय २१, रा. वडगावशेरी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणात सुमीत गौड नावाच्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कौशल लक्ष्मण पायघन (वय २१, रा. केशवनगर) याने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

  कोणीतरी मारहाण करताना दिसले

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशला हा त्याच्या मित्राला भेटण्यास केवशनगर येथील गायरान वस्ती येथील ओम साई मित्र मंडळ येथे गेला होता. तेथे गेल्यानंतर त्याला ओळखीचा मुलगा प्रविण सिंगला कोणीतरी मारहाण करत असताना दिसले. त्यावेळी लगेचच कौशल भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडला.

  लाथा-बुक्क्यांनी मारहाण

  यावेळी राहुल धावारे याने त्याची गचांडी पकडुन गळा दाबून त्याला ढकलून दिले. तर सिध्दार्थ शावळकरने त्याला खाली पाडून सुमित गौड याने त्याच्या कमरेला लावलेले पिस्तूल काढून कौशलच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. सुमितने पुन्हा पिस्तुल कौशलवर रोखुन त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींच्या भीतीमुळे नागरीक भयभीत होऊन पळून गेले. दरम्यान, किरकोळ वादातून घडलेला प्रकार असून, याप्रकणात दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांवर यापूर्वीही गुन्हे आहेत, असे वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी सांगितले.