
२०१९ साली तुम्हीच असं म्हटल्यानुसार डबल इंजिनचं सरकार (Government Of Double Engine) आम्ही आणलं होतं. काही जणांनी बेइमानी केली, म्हणून अडीच वर्ष सरकार येवू शकलं नाही. बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) विचाराच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुढाकार घेतल्यानं आणि मोदींच्या आशीर्वादानं पुन्हा सरकार स्थापन केलं. आज अनेक प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. मात्र त्यात प्रधानमंत्री स्वधिनी योजना (Pradhan Mantri Swadhini Yojana) ही अत्यंत महत्त्वाची आहे. पानवाले, मजूर, फेरीवाले यांचा विचार करुन ही योजना करण्यात आली. त्यावेळी सत्तेत असलेल्या सरकारने या योजनेवर बंदी घातली होती. आता सरकार बदलल्यानंतर १ लाख जणांना या योजनेतून पैसे मिळणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते हे वितरीत करण्यात येतंय.
तुम्ही एकटेच असे पंतप्रधान आहात, ज्यांनी योजना सुरु केली त्याच्या उद्घाटनालाही तुम्हीच उपस्थित आहात. आज मेट्रोचं जे उद्घाटन होतंय. त्याचं भूमिपूजनही मोदींनीच केलं होतं. हा सगळ्यात मोठा चांगला बदल भारतात झाला आहे.
मुंबईवर ज्यांनी राज्य केलं त्यांनी इतक्या वर्षात स्वताची घरं भरली. त्यांनी मुंबईकरांना चांगलं पीणा मिळू दिलं नाही. समुद्रात पाणी सोडण्यासाठी केंद्रानं डिस्चार्ज नॉर्म्स तयार करण्यात आले. मात्र ३ वर्ष त्यात वाटा मिळाला नाही, म्हणून ही योजदना रखडली होती. आज त्याचा शिलान्यास मोदींच्या उपस्थितीत होतोय.
६ हजार कोटींचे रस्त्यांचं उद्घाटन होतंय. चार वर्षांपूर्वी मुंबईचं रस्त्याचं परीक्षण केलं होतं. प्रत्येक वर्षी त्याच रस्त्यांवर काम होतं होतं. आज त्याचं भूमीपजन करण्यात येतंय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सचा पुनर्विकास करण्याचा कार्यक्रमही पंतप्रधानांनी हाती घेतलाय. आज त्याचंही भूमीपूजन होतंय.
मुंबईतील जनतेला तुमचा आशीर्वाद हवाय, १ लाख घरांचं पुनर्विकास करण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं काम होणार आहे. त्याच्या भूमीपूजनाही मोदींना बोलावणार