जगातील सर्वात लोकप्रिय नेत्याकडे ना कार ना घर; जाणून घ्या नरेंद्र मोदींची एकूण संपत्ती

जागतिक स्तरावर सर्वांत शक्तीशाली आणि लोकप्रिय नेते म्हणून नरेंद्र मोदी यांना ओळखले जाते. मात्र त्यांच्याकडे स्वतःचे घर किंवा चारचाकी नाही.

    मुंबई : लोकसभा निवडणूकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा वाराणसी येथून काल (दि.14) उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी वाराणसीमध्ये त्यांनी रोड शो करत शक्तीप्रदर्शन केले. येत्या 1 जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना नरेंद्र मोदी यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे आपली संपत्ती जाहीर केली. जागतिक स्तरावर सर्वांत शक्तीशाली आणि लोकप्रिय नेते म्हणून नरेंद्र मोदी यांना ओळखले जाते. मात्र त्यांच्याकडे स्वतःचे घर किंवा चारचाकी नाही. नरेंद्र मोदी यांनी आपली सर्व संपत्ती आणि सोशल मीडिया, मोबाईल नंबर प्रतिज्ञापत्रामध्ये लिहिले आहे.

    ना बंगला ना गाडी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती 3.02 कोटींची आहे. यामध्ये 52,920 हजारांची रोकड असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे सांगण्यात आले आहे. मोदींच्या करपात्र उत्पन्नात मागच्यावेळेपेक्षा दुपटीने वाढ झाल्याचेही दिसत आहे. 2018-19 च्या प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधान मोदींचे वार्षिक करपात्र उत्पन्न 11 लाख रुपये होते. ते आता 2022-23 मध्ये वाढून 23.5 लाख रुपये इतके झाले आहे. त्याचबरोबर प्रतिज्ञापत्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वतःचे घर नसून स्वतःची चार चाकी गाडी नसल्याचे देखील समोर आले आहे. त्यांच्याजवळ चार सोन्याच्या अंगठ्या असून त्याची किंमत 2 लाख रुपये आहे.

    नरेंद्र मोदी यांचे उत्पन्नाचं साधन काय?

    नरेंद्र मोदी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्पन्नाचं साधन हे त्यांना सरकारकडून मिळणारी सॅलरी आणि त्यांच्या सेविंग्सवर मिळणारा व्याज हे आहे. मोदींनी 2023 ते 2024 या आर्थिक वर्षात 3 लाख 33 हजार 178 हजार रुपये इतका इनकम टॅक्स भरला आहे. त्याचबरोबर गुंतवणूक देखील केली आहे. मोदींची सर्वाधिक संपत्ती ही भारतीय स्टेट बँकेत फिक्स्ड डिपॉजिटच्या रुपात आहे. ही फिक्स्ट डिपॉजिट 1.27 कोटी इतक्या रुपयांची आहे. अशी महिती नरेंद्र मोदींनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे.