PMDTA Rating Aniket Wakankar Tennis Academy NCL Bronze Series 2023 110 Players Participate
PMDTA Rating Aniket Wakankar Tennis Academy NCL Bronze Series 2023 110 Players Participate

    पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्यातर्फे पीएमडीटीए मानांकन (PMDTA Rating) अनिकेत वाकणकर टेनिस अकादमी (Aniket Wakankar Tennis Academy) एनसीएल ब्रॉन्झ सिरिज 2023 स्पर्धेत (NCL Bronze Series 2023 Winners) आयुष देऊसकर, अव्यन पुलगम,रितीशा नेहे, इश्ना नायडू यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

    अनिकेत वाकणकर टेनिस अकादमी एनसीएल पाषाण रोड या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत 10वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत चौथ्या मानांकित आयुष देऊसकरने यश मानेचा 7-5 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित इश्ना नायडू हिने आठव्या मानांकित पलक पाटीलचा 7-1 असा सहज पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.

    8 वर्षाखालील मुलांच्या गटात बिगरमानांकित अव्यन पुलगमने अव्वल मानांकित पलश रूचंदानीचा टायब्रेकमध्ये  7-6(5) असा पराभव विजेतेपदाला गवसणी घातली. मुलींच्या गटात अंतिम लढतीत तिसऱ्या मानांकित रितीशा नेहेने अव्वल मानांकित अदिरा भगतचा 7-6(6) असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

    स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धा संचालक अनिकेत वाकणकर, निलेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुपरवायझर सरदार ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.