पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, सानुग्रह अनुदानासह मिळणार बक्षीस

    पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. यंदा कोणतीही मागणी करण्याची वेळ कामगार संघटनांवर आली नाही. संचालकमंडळाने सानुग्रह अनुदान आणि २१ हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे.
    दरवर्षी पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानासाठी आंदोलन, मागणीचे निवेदन द्यावे लागते.

    पीएमपीएल प्रशासनाकडून महापालिकेकडे निधी

    पैसा उपलब्ध नसल्याने पीएमपीएल प्रशासनाकडून महापालिकेकडे निधी मागितला जातो, असा अनुभव आहे. यंदा मात्र, संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. महागाई भत्त्यावर ८.३३ टक्के इतके सानुग्रह अनुदान, २१ हजार रुपये बक्षीस कर्मचाऱ्यांना जाहीर केले आहे. यासंदर्भातील ठराव नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीत मान्य केला आहे. ही रक्कम कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी हाती मिळणार आहे, अशी माहिती पीएमपीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांनी कळविली आहे.

    दैनंदिन उत्पन्नात लक्षणीय वाढ

    सध्या पीएमपीएलच्या दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या व दैनंदिन उत्पन्नात लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यासाठी सिंह यांनी प्रवासी दिन, प्रवासी मित्र, डेपोनिहाय पालक अधिकारी असे नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविले. यामुळे प्रवाशांना प्रवासीभिमुख सेवा मिळू लागली आहे.

    सर्व शेड्युलनुसार मार्गस्थ

    सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या सांघिक प्रयत्नांमुळे गेल्या ३ महिन्यांत जवळपास सर्व शेड्युलनुसार मार्गस्थ होऊन प्रवाशांना प्रवासीभिमुख सेवा मिळू लागल्याचा दावा प्रशासन करीत अाहे. यापुढील काळातही सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना प्रवासी केंद्रीत सेवा देण्यासाठी सांघिक प्रयत्न करावेत असे अावाहन िसंह यांनी केले आहे.