कळंबोली कामोठे हद्दीतील बेपत्ता मुलं सुखरूप, पालकांनी घाबरून जाऊ नये पोलिसांचे आवाहन.

    पनवेल – नवी मुबंई पोलीस आयुक्तालंय हद्दीतून 48 तासात 6 अल्पवयीन मुलं गायब झाल्याने परिसरात घबराट पसरली होती. कळंबोली आणि कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी या वृत्ता बाबत माहिती घेण्यासाठी सपंर्क साधला असता कामोठे पोलीस ठाणे हद्दीतील मुलगी सापडल्याची माहिती कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांनी दिली तर. कळंबोली पोलीस ठाणे हद्दीतील बेपत्ता असलेल्या दोन मुली स्वतःहून घरी परतल्या असल्याची माहिती पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.पालकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पोलिसांनी जनतेला केल आहे.