रागयडमधील न्हावाशेवा बंदरात १ हजार ७०० कोटींचं ड्रग्ज जप्त

रायगड समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा (Security) यंत्रणेत वाढ केल्याची घटना ताजी असताना, आज पुन्हा एकदा रायगडमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. रागयडमध्ये १ हजार ७०० कोटींचं ड्रग्ज (Drugs) जप्त करण्यात आलं आहे. रागयड न्हावाशेवा बंदरात (port of Nhavasheva) हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

    रायगड : रायगडमध्ये (Raigad) मागील महिन्यात एका बोटीत एके ४७ तसेच अन्य शस्त्रास्त्र सापडल्याची घटना ताजी असताना, तसेच या घटनेनंतर रायगड समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा (Security) यंत्रणेत वाढ केल्याची घटना ताजी असताना, आज पुन्हा एकदा रायगडमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. रागयडमध्ये १ हजार ७०० कोटींचं ड्रग्ज (Drugs) जप्त करण्यात आलं आहे. रागयड न्हावाशेवा बंदरात (port of Nhavasheva) हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

    दरम्यान, जवळपास २२ टन हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं ही कारवाई केली आहे. तसेच रायगडमध्ये अजूनपर्यंत सर्वांत मोठी ही कारवाई समजली जात आहे. रागयड न्हावाशेवा बंदरातून ड्रग्ज सप्लाय होणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती, त्यानुसार पोलिसांना सापळा रचत तब्बल १ हजार ७०० कोटींचं ड्रग्ज जप्त केले आहे. यासाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला रायगडमध्ये यावे लागले, तसेच त्यांच्या या मोठा कारवाईचे कौतुक करण्यात येत आहे.