केतकी चितळेनंतर शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात, तरुणावर कारवाई होणार

शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिव्ट करत त्यामध्ये पवारांना मारण्याची वेळ आली आहे, असा वादग्रस्त मजकूर लिहणाऱ्या नाशिकच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या तरुणाने पवारांविरोधात आक्षेपार्ह ट्विट केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कारवाईची मागणी केली होती. निखील भामरे असं या तरुणाचे नाव आहे. याने शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्यामुळं त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

    मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर लोकांच्या रोषानंतर केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण ताजे असताना, आता शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिव्ट करत त्यामध्ये पवारांना मारण्याची वेळ आली आहे, असा वादग्रस्त मजकूर लिहणाऱ्या नाशिकच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या तरुणाने पवारांविरोधात आक्षेपार्ह ट्विट केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कारवाईची मागणी केली होती. निखील भामरे असं या तरुणाचे नाव आहे. याने शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्यामुळं त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

    दरम्यान, सोशल मीडियावर निखिल भामरे या तरुणाने शरद पवार यांच्याबाबत जीवे मारण्याचे टिव्ट केले होते. तसेच यात आक्षेपार्ह मजकूर लिहिला आहे. त्या ट्विटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गृहनिर्माण जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटचा फोटो शेअर करत तरुणावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाचा शोध घेत याला ताब्यात घेतले आहे. निखील भामरेने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘वेळ आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची’ आशा आशयाचा मजकूर आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन काय पातळीवर हे सगळे होत आहे. या विकृत इसमाविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    आज सकाळी केतकी चितळे हिने राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर लोकांच्या रोषानंतर केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण ताजे असताना, आता शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिव्ट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.