crime

धुळ्यातील (Dhule Crime) राजेंद्र कटारीया हे पत्नीसह उपचारांसाठी मुंबई येथे गेले होते. याचाच फायदा घेऊन चोरट्या बाचक्याने घरावर हात साफ केला. त्यानंतर त्यांच्या घरातील लाईट चालू असल्याचे अपार्टमेंटमधील नागरिकांना दिसले. त्यामुळे अपार्टमेंटमधील रहिवाशांनी घरात जाऊन बघितले असता, घरात चोरी झाल्याची बाब समोर आली.

    धुळे : अरिहंत भवनाजवळ घडलेल्या घरफोडीची उकल करण्यात धुळ्यातील आझाद नगर(Azadnagar) पोलिसांना यश आले आहे. केवळ चार तासांतच गुन्हा उघडकीस आणून घरफोडी करणारा अवघ्या २८ वर्षाचा ‘बाचक्या’ जेरबंद झाला आहे. त्याच्यावर तब्बल १७ गुन्हे (Dhule Crime) दाखल आहेत. ही कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या आझाद नगर पोलिसांनी (Azadnagar Police Station) त्यांच्याकडून मुद्देमालही हस्तगत केला आहे.

    याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली की, राजेंद्र कटारीया हे पत्नीसह उपचारांसाठी मुंबई येथे गेले होते. याचाच फायदा घेऊन चोरट्या बाचक्याने घरावर हात साफ केला. त्यानंतर त्यांच्या घरातील लाईट चालू असल्याचे अपार्टमेंटमधील नागरिकांना दिसले. त्यामुळे अपार्टमेंटमधील रहिवाशांनी घरात जाऊन बघितले असता, घरात चोरी झाल्याची बाब समोर आली. अपार्टमेंटमधील रहिवाशांनी ही माहिती घरमालक राजेंद्र कटारीया यांना फोनद्वारे दिली. त्यानुसार धुळे पोलिसांनाही लगेच कळविण्यात आले.

    पोलिसांनी घरमालकांचा पुतण्या दिनेश कटारीया यांच्या मदतीने घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा घरातील वस्तू विखुरलेल्या दिसल्यात. शिवाय, कपाटाची तिजोरी फोडून ६३ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे आढळून आले. आझाद नगर पोलिसांनी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक जण पहाटे ४ ते ४.३० वाजेच्या सुमारास राजेंद्र कटारीया यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरी करुन निघाल्याचे निष्पन्न झाले.

    पोलिसांनी लागलीच तपासाची चक्रे वेगाने फिरवून अवघ्या काही तासातच आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. आझाद नगर पोलिसांनी संशयिताची ओळख पटवली असता तो इम्रान उर्फ बाचक्या शेख असल्याची खात्री झाली. सराईत असलेल्या बाचक्याच्यामुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कसोशीने प्रयत्न केले. अवघ्या चार तासांतच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच बाचक्याने गुन्ह्याची कबुली देत त्याच्याकडील ५२ हजार रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली लोखंडी टॅमी व पसार होण्यासाठी वापरण्यात आलेली ७० हजार रुपये किमतीची पल्सर गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.