बनावट नोटा वटविण्यासाठी आलेल्या त्रिकुटाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बनावट नोटा (Fake Notes) वटविण्यासाठी आलेल्या त्रिकुटला मगंळवारी रात्री कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशनमधील (Mahatma Phule Police Station) पोलिसांनी रंगेहाथ पकडून बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत.

    कल्याण : कल्याण (Kalyan) स्टेशन परिसरातील एस. टी. स्टँड गेटवर बनावट नोटा (Fake Notes) वटविण्यासाठी आलेल्या त्रिकुटला मगंळवारी रात्री कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी रंगेहाथ पकडून बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत.

    पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पेट्रोलिंग डयुटी करीत असलेल्या पोलिसांना एस टी.स्टँड , इनगेटवर काही तरुण भारतीय बनावट चलनी नोटा वटविण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मंगळवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सरोदे, पोलीस हवालदार भालेराव, सुचित टिकेकर, रविंद्र हसे, सुमीत मदाळे, भोईर यांनी या ठिकाणी सापळा रचुन रजनेश कुमार चौधरी , हर्षद  खान , अर्जुन कुशवह  या कल्याण पूर्वेकडे राहणाऱ्या त्रिकुटाला ताब्यात घेत त्यांची झडती घेतली.

    झडतीच्या वेळी त्यांच्या कडून भारतीय चलनातील ५० , १०० , २०० रूपये दराच्या एकुण २५,००० रुपयांच्या बनावट नोटा सपाडल्या. तसेच त्यांच्याकडील रेडमी कंपनीचा मोबाईल फोन व टीव्हीएस स्कुटी मोटारसायकल क्र . एम . एच . १४ एफ . बी . १८९९ ही गाडी जप्त केली आहे. या प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरूध्द गुन्हा रजिस्ट्रेशन नं. २६५/२०२२ भा.द.वि. कलम ४८९ ( ब ) (क ) , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सरोदे करीत आहे.