पोलीसांनी माेबाईल चाेरांच्या आवळल्या मुसक्या, मुख्य सुत्रधारासह दोघांना अटक; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरवळ (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत असणाऱ्या इन्टेक्स ट्रान्सपोस्टेशन सव्हिर्सेस प्रा. लि. या कपंनीच्या शिरवळ येथील कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या कामगार व चालकाकडून १२ लाख २० हजार ९५९ रुपयाचे मोबाईलसह इतर साहित्य लंपास केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार कारवाई करत शिरवळ पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली.

    शिरवळ : शिरवळ (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत असणाऱ्या इन्टेक्स ट्रान्सपोस्टेशन सव्हिर्सेस प्रा. लि. या कपंनीच्या शिरवळ येथील कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या कामगार व चालकाकडून १२ लाख २० हजार ९५९ रुपयाचे मोबाईलसह इतर साहित्य लंपास केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार कारवाई करत शिरवळ पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरवळ (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत असणाऱ्या इन्टेक्स ट्रान्सपोस्टेशन सव्हिर्सेस प्रा. लि. या कपंनीच्या शिरवळ येथील कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या कामगार व चालकाकडून १२ लाख २० हजार ९५९ रुपयाचे मोबाईलसह इतर साहित्य लंपास केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील मुख्य सुत्रधार कार्यालयीन कर्मचारी श्रीकांत विनोद घनवट (वय २२, रा. राजापूर, ता. खटाव, जि. सातारा) वाहन चालक राजेंद्र लक्ष्मण सांगळे (वय ३९, रा. कहेवाडी, ता. आष्टी, जि. बीड) यांना ताब्यात घेत संबंधितांकडून १२ लाख २० हजार ९५९ रुपयांच्या मुद्देमाल पैकी ४१ मोबाईल फोन हस्तगत करत ६ लाख ७० हजार ३८६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये मुख्य सुत्रधारासहित गुन्हामध्ये शिरवळ पोलिसांनी दोघांना अटक केली.

    या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे, पोलीस अंमलदार संजय धुमाळ, सचिन वीर, जितेंद्र शिंदे, तुषार कुंभार, प्रशांत धुमाळ, मंगेश मोझर, सुरज चव्हाण यांनी सहभाग घेतला, हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल सहभागी सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी अभिनंदन केले.

    तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपुर्ण तपास

    सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप व शिरवळ गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपुर्ण तपास करीत गुन्हा उघडकीस आणला.