पोलिसांसाठी महत्त्वाची सूचना, आता खाकी वर्दीत असताना नाचता येणार नाही…

पोलिसांनी अशाप्रकारे खाकी वर्दीत मिरवणुकीत नाचणे हे अवमानकारक असल्यांचं सांगण्यात आलं असून त्यामुळे गणवेश असताना पोलिसांनी मिरवणुकीत नाचू नये, असे निर्देश देण्यात आले आहे.

    मुंबई: गणेशोत्सव दरम्यान बेंधुद होऊन नाचणाऱ्य पोलिसांचा व्हिडिओ सोशल (Viral Video)  मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावरुन काही दिवसांपासून चांगलीच चर्चा रंगली होती की अशाप्रकारे पोलिसांनी नाचणं योग्य की अयोग्य. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मिळाली असून यापुढे गणवेशात पोलीसांना नाचण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्य पोलीस महासंचालक कार्यालयातून ही महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आली आहे.

    एकतर दोन वर्षाच्या निर्बंधानंतर गणेशोत्सव साजार झाल्याने गणेशभक्तांला उत्साह शिगेला पोहचला होता. राज्यभरात गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा झाला. कोल्हापूरमध्ये गणेश मिरवणुकी दरम्यान पोलिसांनी गाण्यावर ठेका धरला. खाकी वर्दीत पोलीस नाचतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यावरुन कुणी विरोधात बोलताना दिसलं तर कुणी पोलिसांच समर्थन केलं. पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता पोलिसांना खाकी वर्दी घालून नाचण्यास मनाई करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत सरंगळ यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना याबाबत सक्त ताकीद दिली आहे. पोलिसांनी अशाप्रकारे खाकी वर्दीत मिरवणुकीत नाचणे हे अवमानकारक असल्यांचं सांगण्यात आलं असून त्यामुळे गणवेश असताना पोलिसांनी मिरवणुकीत नाचू नये, असे निर्देश देण्यात आले आहे.