पोलिसांच्या गाड्यांची धुरा आता महिलांकडे;अजित पवारांनी दिली माहिती

आज राज्य सरकारतर्फे बारामतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रासाठी 'नमो महारोजगार मेळाव्या'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील उपलब्ध संधी, बजेटमध्ये तरुणांसाठी करण्यात आलेल्या तरतूदी आणि पोलीस खात्यातील माहिती दिली.

    बारामती – आज राज्य सरकारतर्फे बारामतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रासाठी ‘नमो महारोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील उपलब्ध संधी, बजेटमध्ये तरुणांसाठी करण्यात आलेल्या तरतूदी आणि पोलीस खात्यातील माहिती दिली.

    ‘नमो महारोजगार मेळाव्या’वेळी बोलताना अजित पवार यांनी महिलांसाठी निर्माण करण्यात आलेल्या संधी याबाबत माहिती दिली. अजित पवार म्हणाले, “राज्यातील अनेकांना रोजगार मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर महिलांनाही संधी देण्याचं काम महायुती सरकार करत आहे. पोलिसांच्या ताफ्यात नवीन 39 गाड्या दाखल झाल्या आहेत. याचा शुभारंभ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून मी केला. तिथे ३९ वाहनांमध्ये जे ड्रायव्हर होते, त्याच्यात १४ महिला होत्या. सर्वांत चांगलं काम त्यांचं सुरू होतं. महिलांना संधी देण्याचं काम महायुती सरकार करत आह,” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. त्यामुळे १४ पोलीस गाड्या या महिला चालवणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

    या शासकीय कार्यक्रमावेळी अजित पवार यांच्यासह मंचावर सुनेत्रा पवार व दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते. त्याचबरोबर खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होते. अजित पवारांनी मात्र दोघांशी बोलणे टाळणे आणि भाषणामध्ये देखील त्यांचा हलकासा उल्लेख केला.