सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस कॉस्टेबल प्रशांत कासले यांचा गौरव

गहाळ, चोरीस गेलेले २० मोबाईल हस्तगत करण्याची पोलिसांनी बजावली विशेष कामगिरी, पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांच्या हस्ते गौरव

    सिंधुदुर्ग पोलीस दलात कणकवली पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस कॉस्टेबल प्रशांत कासले यांनी सीईआयआर पोर्टलद्वारे नागरिकांचे गहाळ व चोरीस गेलेले तब्बल २०मोबाईल हस्तगत करण्यात विशेष कामगिरी बजावली. त्याबद्दल सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांच्या हस्ते प्रशांत कासले यांना प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पोलीस निरिक्षक सचिन हुंदळेकर उपस्थित होते.

    यानिमित्ताने कणकवली पोलीस ठाण्याचा सन्मान झाल्याबद्दल पोलीस कॉस्टेबल प्रशांत कासले यांचे पुच्छगुच्छ देऊन कणकवली पोलीस निरिक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरिक्षक अनिल हाडळ यांनी सत्कार केला. श्री.कासले यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.