मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात अमली पदार्थ पोहचवणारा पोलिस शिपाई निलंबित; अमिताभ गुप्ता यांचे आदेश

मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात अमली पदार्थ लपवून नेणाऱ्या कारागृहातील रक्षक विवेक नाईक याला निलंबित करण्याचे आदेश कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता (Amitabha Gupta) यांनी दिले.

    पुणे : मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात अमली पदार्थ लपवून नेणाऱ्या कारागृहातील रक्षक विवेक नाईक याला निलंबित करण्याचे आदेश कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता (Amitabha Gupta) यांनी दिले. मुंबई मध्यवर्ती कारागृहात शिपाई नाईक याने अंर्तवस्त्रात लपवून अमली पदार्थ नेले होते.

    ६ ऑक्टोबर रोजी रात्रपाळीत कारागृहातील हवालदार दीपक सूर्याजी सावंत गस्त घालत होते. त्यावेळी शिपाई नाईक याची तपासणी सावंत यांनी केली. नाईक याने अंर्तवस्त्रात काहीतरी लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. त्यावेळी नाईकने सावंत यांना विरोध केला. नाईकने कारागृहातील मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. सावंत यांनी त्याला ताब्यात घेतले.

    बंदोबस्तावरील कारागृहातील शिपायांनी त्याला कारागृह अधीक्षक कार्यालयात नेले. त्याची पु्न्हा तपासणी करण्यात आली. तेव्हा नाईकने अंर्तवस्त्रात प्लास्टिकची पिशवी ठेवली होती. पिशवीत आठ कॅप्सुल सापडल्या. कॅप्सुल उघडल्यानंतर त्यात गांजासदृश अमली पदार्थ लपविल्याचे उघडकीस आले. नाईक याच्याकडून ७१ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले.