Lalit Patil
Lalit Patil

  पुणे : ललित पाटील ड्रग्जप्रकरणात पुणे पोलिसांनी आज न्यायालयात गोपनीय अहवाल सादर केला आहे. दरम्यान, आज ललित पाटीलसह 8 जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांनी वाढ  केली आहे.
  दोन कोटी 14 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त
  ललित पाटील, अरविंद लोहरे, भूषण पाटील, हरिश्चंद्र पंत, अमीर शेख, रोहित चौधरी, यांच्यासह ८ जणांना पोलीस कोठडी सुनावली आहेत. ससून रुग्णालयाच्या गेटजवळ गुन्हे शाखेने दोन कोटी 14 लाख रुपयांचे ड्रग्ज पकडले होते. या प्रकरणात पुणे पोलिसांनी ललित पाटील व त्याच्या साथीदारांवर मोक्का कारवाई केली आहे.
  ललित पाटीलसह 8 जणांच्या पोलीस कोठडीत 5 दिवसांनी वाढ
  दरम्यान, आज आरोपींची पोलीस कोठडी संपली. त्यानंतर मोक्का न्यायालयात त्यांना हजर केले. न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत 5 दिवसांनी वाढ केली आहे. दरम्यान, न्यायालयात पुणे पोलिसांनी आज तपासाबाबत गोपनीय अहवाल सादर केला. अहवाल तपासातील महत्वाच्या गोष्टी असून, त्या उघड केल्यानंतर पोलिसांना तपासाला अडथळा होईल, असे यावेळी सांगण्यात आले.
  तसेच, ललित पाटील याचे मोठं-मोठे प्लॅन होते, मात्र पुणे पोलिसांनी कारवाई केल्याने त्याचे पुढचे प्लॅन बंद झाले म्हणता येतील, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले।