aniksha and amruta

फॅशन डिझायनर असल्याचं सांगत अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याशी जवळीक साधली. पुस्तकाचे प्रकाशन केले आणि त्यानंतर वडिलांची फसवणूक झाल्याचं सांगत मदतीची मागणी केली. अनिक्षा ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. वडिलांना मदत करण्याच्या बदल्यात एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्नही तिने केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानी (Aniksha Jaisinghani) हिला अटक झाली असून तिला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे.

फॅशन डिझायनर असल्याचं सांगत अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याशी जवळीक साधली. पुस्तकाचे प्रकाशन केले आणि त्यानंतर वडिलांची फसवणूक झाल्याचं सांगत मदतीची मागणी केली. अनिक्षा ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. वडिलांना मदत करण्याच्या बदल्यात एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्नही तिने केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

अमृता फडणवीस यांनी तक्रार केल्यानंतर अनिक्षाला अटक करण्यात आली. विशेष कोर्टामध्ये तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कस्टडी घेताना मुंबई पोलिसांनी तिच्यावर खंडणी मागितल्याचेही आरोप केले आहेत. अनिक्षाने अमृता फडणवीसांना काही व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल केलं आणि त्यांच्याकडून 10 कोटी रुपयांची मागणी केली.

दरम्यान बुकी अनिल जयसिंघानी अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला फसवण्याचा प्रयत्न झाल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमृता फडणवीस यांच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही कामे करण्यासाठी प्रयत्न झाला आहे. पहिल्यांदा पैशांची ऑफर देण्यात आली. त्यानंतर ब्लॅकमेल करण्यात आलं. यामध्ये अनिल जयसिंघानी नावाचा एक व्यक्ती आहे. जो गेल्या सात ते आठ वर्षापासून फरार असून त्याच्या नावावर 14 ते 15 गुन्हे आहेत. अनिल जयसिंघानी यांची एक मुलगी आहे. ती मुलगी 2015-16 च्या दरम्यान अमृता फडणवीस यांना भेटली होती. काही वर्षांनंतर अचानक 2021 नंतर या मुलीने माझी पत्नी अमृता फडणवीस यांना भेटायला सुरुवात केली. या मुलीने डिझायनर असल्याचं सांगितलं. तसेच प्रभावशाली 50 महिल्यांच्या यादीत माझे नाव आल्याचं त्या मुलीने सांगितले. तसेच आईवर लिहिलेल्या एका पुस्तकाचं प्रकाशन देखील त्या मुलीने अमृता फडणवीस यांच्याकडून करुन घेतले. या माध्यमातून त्या डिझायनर असलेल्या मुलीने विश्वास संपादन केला. त्यानंतर त्या मुलीने येणं जाणं सुरु केलं. यातून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

काय आहे प्रकरण?
एका केसमध्ये मदत करण्यासाठी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी या तरुणीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना धमकी देण्यात आली अशी तक्रार अमृता फडणवीस यांनी मुंबईतील मलबार हिल पोलिस स्टेशनमध्ये 20 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर अनिक्षाविरोधात गुन्हा दाखल झाला. आता अटक करून तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिक्षा ही गेल्या 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत 1 कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर अमृता फडणवीस यांना अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.