
शुक्रवारी बडनेरा येथे आठवडी बाजार असून सदर जनावरे विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला. पोलिसांच्या समय सुचकतेमुळे ३८ जनावरांना जीवनदान मिळाले.
नांदगाव पेठ : नांदगाव पेठ (Nandgaon Peth) येथून अमरावतीकडे (Amravati) कत्तलीसाठी (For slaughter) जाणाऱ्या ३८ जनावरांना (38 animal) पोलिसांनी जीवनदान (Police gave life) दिले. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान टोल नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. सर्व जनावरांना सुरक्षितरित्या गौरक्षणामध्ये रवाना करण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रवीण काळे (Police Inspector Praveen Kale) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.
गुरुवारी सकाळी मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी नांदगाव पेठ टोल नाक्यावर नाकाबंदी केली. दरम्यान नांदगाव पेठ येथील बाजार मार्गे जनावरे घेऊन जाणारा वाहनचालक शेख शब्बीर वल्द शेख अब्दुल (५५, रा. कुरेशी नगर, अमरावती) व शेख रउफ शेख भूरु (५०, रा. कुरेशी नगर, आठवडी बाजार, नांदगाव पेठ) यांची पोलिसांनी विचारपूस केली. त्यावेळी शुक्रवारी बडनेरा येथे आठवडी बाजार असून सदर जनावरे विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला. पोलिसांच्या समय सुचकतेमुळे ३८ जनावरांना जीवनदान मिळाले. ही कारवाई पोलीस हवालदार संजय खारोडे (Police Constable Sanjay Kharode) व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी केली.