नंदुरबार तरुणीच्या हत्येप्रकरणी पोलीस निरीक्षकासह सहा जणांच्या बदल्या

हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यावर पोलीस अधीक्षकांची ग्रामस्थांनी भेट घेतल्यानंतर या प्रकरणात फेरशवविच्छेदन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मुलीचा मृतदेह गुरुवारी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं असून अखेर दीड महिन्यानंतर कुटुंबीयांनी आदिवासी रितीरिवाजाप्रमाणे पार्थिवावर अंत्यसंस्कार केला.

    नंदुरबार येथील तरुणीच्या हत्येप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात तपासात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत पोलिसांवर कारवाईचा करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षकासह सहा जणांची बदली करण्यात आली आहे.

    नंदुरबारच्या धडगाव येथे एका महिलेता मृतदेह आढळला होता. मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. याबाबत पोलिसांत तक्रार करुन पोलिसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता. तिच्यावर अत्याचार झाला असून तिला फाशी देण्यात आली असून पोलिसांच्या मदतीने ही आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न चालला असल्याचा आरोप तिच्या वडिलांसह केला होता. हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यावर पोलीस अधीक्षकांची ग्रामस्थांनी भेट घेतल्यानंतर या प्रकरणात फेरशवविच्छेदन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मुलीचा मृतदेह गुरुवारी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं असून अखेर दीड महिन्यानंतर कुटुंबीयांनी आदिवासी रितीरिवाजाप्रमाणे पार्थिवावर अंत्यसंस्कार केला. तर, या प्रकरणी तक्रार मिळुनही तपासात दिंरगाई करणाऱ्या धडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोकुळ औताडे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. तर, उपनिरीक्षक बी. के. महाजन ,संजय मनोरे, किरण वळवी, उदेसिंग ठाकरे, योगेश निकम या पोलीस कर्मचाऱ्यांची इतर पोलीस ठाण्यांत बदली करण्यात आली आहे.