पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात उत्साही कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

आज दसऱ्यानिमित्त राज्यभरात राजकीय नेत्यांचे अनेक मेळावे होत आहेत, मुंबईत शिवसेनेचा शिवाजी पार्कवर तर बीकेसीत शिंदे गटाचा दसरा मेळावा होत आहे.

    बीड : दरवर्षी प्रमाणे यंदाही भाजपा (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांचा भगवान गडावर पारंपरिक दसरा मेळावा साजरा होत आहे. यावेळी या मेळाव्यास पंकजा मुंडे यांनी संबोधित केले. मात्र, त्यांच भाषण संपल्यानंतर काही उत्साही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती नियत्रंणाबाहेर जात होती त्यामुळे पोलिसांनी या उत्साही कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याची माहीती समोर येत आहे.

    आज दसऱ्यानिमित्त राज्यभरात राजकीय नेत्यांचे अनेक मेळावे होत आहेत, मुंबईत शिवसेनेचा शिवाजी पार्कवर तर बीकेसीत शिंदे गटाचा दसरा मेळावा होत आहे. भाजपा (BJP) नेत्या पंकजा मुंडे यांचाही आज भगवान गडावर पारंपरिक दसरा मेळावा होत आहे. या दरम्यान पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. या वेळी भाषणाच्या सुरवातीलाचा काही तरुणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्केमुळे काही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, पंकजा मुंडेंच्या भाषणानंतरही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. या दरम्यान, पोलिसांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला मात्र, कार्यकर्ते काही ऐकत नव्हते त्यामुळे पोलिसांना त्यां