Curbing the ongoing burglary in Vidarbha, the police arrested the gang

एका पोलीस कर्मचाऱ्याने सराफा व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. संतोष वाघ (Santosh Wagh) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, तो औरंगाबाद (Aurangabad) ग्रामीण पोलिसात सोयगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

    औरंगाबाद: औरंगाबाद (Aurangabad) पोलीस दलात एका घटनेने खळबळ उडाली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने सराफा व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी औरंगाबाद (Aurangabad Crime) शहर हद्दीतील सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Aurangabad City Cidco MIDC Police) या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    संतोष वाघ असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, तो औरंगाबाद ग्रामीण पोलिसात सोयगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. संतोष वाघ याने आपला मित्र रामचंद्र दहिवाळ याच्यासह सराफा व्यापाऱ्याला केंब्रिज चौकात अडवलं. पोलीस असल्याचे सांगत चौकशी करण्याच्या बहाण्याने अडवून तब्बल २४ तोळे सोनं आणि ८ लाख ४० हजार रुपये कॅश अशोक विसपुते या सराफा व्यापाऱ्याकडून लुटली.

    याप्रकरणी, सराफा व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी संतोष वाघच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला एमआयडीसी सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोयगाव पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार असलेला संतोष वाघ याने ज्वेलर्सला अडवून २४ तोळे सोने, ८ लाख ४० हजार रोख रक्कम चोरली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.  या प्रकरणाचा तपास सुरू असून गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केली असल्याची माहिती सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली आहे.