Police raid Gutkha warehouse! 8 lakh 26 thousand items confiscated

अचलपूर पोलिसांनी (Achalpur Police) दुल्हा गेट परिसरातील ( Dulha Gate area ) ॲक्सा फर्निचर (Axa Furniture) दुकानाच्या गोदामात धाड टाकली असता, तेथे मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसाला आढळून आला.

    अचलपूर : अन्न व औषधी प्रशासन विभाग ( Department of Food and Drug Administration ) आणि अचलपूर पोलिसांनी (Achalpur Police) संयुक्तरित्या एका गुटख्याच्या गोदामावर (Gutkha warehouse ) धाड टाकली. या धाडीत त्यांनी तब्बल ८ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २१ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली. या धाडीत पोलिसांना मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला आहे. याबाबत गांभीर्याने तपास करत कडक कारवाई केली जाणार आहे.

    गुप्त माहितीवरून अचलपूर पोलिसांनी (Achalpur Police) दुल्हा गेट परिसरातील ( Dulha Gate area ) ॲक्सा फर्निचर (Axa Furniture) दुकानाच्या गोदामात धाड टाकली असता, तेथे मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसाला आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मोहम्मद शोएब बिस्मिल्ला (२९, रा. कासदपुरा, अचलपूर) याच्या ताब्यातून गुटख्याचा मुद्देमाल जप्त करून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.