blue star bar

तुर्भ्याच्या ब्लू स्टार नावाच्या बारमध्ये (Police Raid On Blue Star Bar) महिला नर्तकींकडून अश्लील हावभाव सुरू असल्याची तक्रार प्राप्त होताच गुन्हे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या पथकाने कारवाई केली.

    कोपरखैरणे: नवी मुंबईतील (Navi Mumbai) तुर्भे येथील एका बारमध्ये नियमबाह्य पद्धतीने चालणाऱ्या कृत्यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. तुर्भे (Turbhe) येथील बारवर रात्री धाड (Raid On Blue Star Bar) टाकून पोलिसांनी अश्लील हावभाव करणाऱ्या महिला आणि बारमधील कामगारांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.

    तुर्भ्याच्या ब्लू स्टार नावाच्या बारमध्ये महिला नर्तकींकडून अश्लील हावभाव सुरू असल्याची तक्रार प्राप्त होताच गुन्हे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या पथकाने कारवाई केली. या धाडीत बारमधील सुमारे ३८ महिला वेटर व नर्तकी यांच्यासह १० पुरुष वेटर आणि बारचे व्यवस्थापक रूषीकांत विश्वेश्वर रावत अशा एकूण ४९ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आली असून नियमबाह्य पद्धतीने बार सुरू ठेवल्यास कारवाई आणखी तीव्र केली जाईल, अशी माहिती गुन्हे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.

    नवी मुंबई तुर्भे सेक्टर २६ मधील अशोका कॉम्प्लेक्समधल्या ब्ल्यु स्टार सर्व्हीस बार अँड रेस्टारंटमध्ये महिला नर्तकी वाद्यवृंद संगीताच्या नावाखाली अश्लील वर्तन करीत असल्याने ही कारवाई करण्यात आली.
    पोलिसांनी संबंधित बार मॅनेजर, पुरुष वेटर व महिला वेटर यांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.