गावठी दारु अड्ड्यावर पोलिसांचा छापा

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील खलसे वस्ती येथे गावठी दारु अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत सदर ठिकाणची गावठी दारु जप्त केली तसेच  दारु विक्री करणाऱ्या सुमन दशरथ खलसे या महिलेवर गुन्हे दाखल करण्यात आले.

    शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील खलसे वस्ती येथे गावठी दारु अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत सदर ठिकाणची गावठी दारु जप्त केली तसेच  दारु विक्री करणाऱ्या सुमन दशरथ खलसे या महिलेवर गुन्हे दाखल करण्यात आले. खलसे वस्ती येथे एक महिला गावठी दारुची विक्री करत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली त्यांनतर सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, अविनाश थोरात, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, विकास पाटील, निखील रावडे, महिला पोलीस नाईक राणी भागवत यांसह यांनी सदर ठिकाणी जात छापा टाकला. तेथे त्यांना एक महिला नागरिकांना गावठी दारू विक्री करत असल्याचे दिसून आले, मात्र, पोलीस आल्याची चाहूल लागताच महिला पळून जाण्यात यशस्वी झाली.   पोलिसांनी सदर ठिकाणी मिळून आलेले गावठी दारुचा लहान ड्रम जप्त केला.   याबाबत महिला पोलीस नाईक राणी पंढरीनाथ भागवत यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.  पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.