जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा, ९ लाख १२ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त; ४ जणांवर गुन्हा दाखल

आंधळगाव येथे ५२ पानाच्या जुगारावर पैशाची पैज लावून खेळत असताना जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ९ लाख १२ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

    मंगळवेढा : आंधळगाव येथे ५२ पानाच्या जुगारावर पैशाची पैज लावून खेळत असताना जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ९ लाख १२ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. निलेश सिताराम लेंडवे,अमर बाळासो जाधव (आंधळगाव), नवनाथ मुरलीधर खटकाळे (अकोला), विठ्ठल तुकाराम लाड (घोडेश्वर) या चौघावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंधळगाव ते लक्ष्मी दहिवडी कडे जाणाऱ्या रोडवर नेचर डेअरीच्या बाजूस पत्रा शेडच्या आडोशाला (दि.२३) रोजी सायंकाळी ५.३० वाजता काही लोक ५२ पानाच्या जुगारावर पैशाची पैज लावून खेळत असल्याची गोपनीय माहिती पो.नि.रणजीत माने यांना मिळताच त्यांनी पोलीसांच्या मदतीने सदर ठिकाणी छापा टाकला.

    यावेळी १२ हजार 300 रोख रक्कम, ८ लाख किंमतीची स्कॉर्पीयो गाडी, ७५ हजार रुपयाची हिरो कंपनीची स्प्लेंडर गाडी, २५ हजार रुपये किंमतीची डिलक्स मोटर सायकल असा एकूण ९ लाख १२ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल पोलीसांना मिळून आला. याची फिर्याद पोलीस अंमलदार प्रमोद साळुंखे यांनी दिल्यावर वरील चौघा आरोपीवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुर्यकांत धापटे हे करीत आहेत.