
कचरेवाडी येथे एका पडीक शेतातील चिल्लारीच्या झाडाखाली 52 पानाच्या पत्त्यावर पैशाची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळणार्या ठिकाणी पोलीसांनी छापा टाकून 1 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन 8 जणांना ताब्यात घेतले आहे.
मंगळवेढा : कचरेवाडी येथे एका पडीक शेतातील चिल्लारीच्या झाडाखाली 52 पानाच्या पत्त्यावर पैशाची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळणार्या ठिकाणी पोलीसांनी छापा टाकून 1 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी नंदकुमार कोळेकर (वय 40), सुरेश गरंडे (वय 28), जोतीराम चव्हाण (वय 57), भिकन काळुंगे (वय 56), मल्हारी जगदाळे (वय 45), मायाप्पा माने (वय 45), बबन शिंदे (वय 33), शिवाजी गोडसे (वय 40), नवनाथ माने (वय40) या आठ जणाविरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कचरेवाडी येथील शिवारात मन्ना नावाचा जुगार पैशाची पैज लावून खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधिकारी नयोमी साटम यांना मिळताच त्यांनी पोलीसांच्या मदतीने दि.3 रोजी सायंकाळी 4 वाजता छापा टाकला त्यावेळी वरील आठ आरोपी गोलाकार बसून 52 पत्याच्या पानावर जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलीसांनी त्यांना जागीच गराडा घालून पकडले.
घटनास्थळी पोलीसांनी 5 हजार 50 रोख रक्कम, 85 हजार रुपये किंमतीची एक होंडा शाईन गाडी, 10 हजार रुपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल, 800 रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, असा एकूण 1 लाख 850 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.