रिक्षाचोरास पकडण्यात पोलीसांना यश, तीन रिक्षा केल्या जप्त; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई (Mumbai) येथुन रिक्षा (Riksha) चोरुन आणुन गावाकडे फिरवणार्या व्यक्तीचा म्हसवड चे स.पो.नि. राजकुमार भुजबळ यांना संशय आल्याने त्यांनी संबधीताची कसुन माहिती घेतली असता संबधित व्यक्ती हा अस्सल चोरटा असल्याचे समोर आल्याने पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले असता त्याने एक नव्हे तर तब्बल ३ रिक्षांची मुंबईत चोरी केली असल्याचे म्हसवड पोलीसांसमोर कबुल केले.

    म्हसवड : मुंबई (Mumbai) येथुन रिक्षा (Riksha) चोरुन आणुन गावाकडे फिरवणार्या व्यक्तीचा म्हसवड चे स.पो.नि. राजकुमार भुजबळ यांना संशय आल्याने त्यांनी संबधीताची कसुन माहिती घेतली असता संबधित व्यक्ती हा अस्सल चोरटा असल्याचे समोर आल्याने पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले असता त्याने एक नव्हे तर तब्बल ३ रिक्षांची मुंबईत चोरी केली असल्याचे म्हसवड पोलीसांसमोर कबुल केले.

    रिक्षाची चोरी केल्याचे केले कबूल

    याबाबत म्हसवड पोलीसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील कुकुडवाड गावातील माणीकराव तुपे हा प्रत्येक महिन्याला नवनवीन रिक्षा गावाकडे आणुन तो म्हसवडमध्ये फिरवत असल्याची माहिती म्हसवड चे स.पो.नि. राजकुमार भुजबळ यांना मिळाल्याने त्यांनी संबधित व्यक्तीची माहिती घेण्यास सांगितली. त्यामुळे त्याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडे असलेल्या या रिक्षाबद्दल माहिती तो पोलिसांना व्यवस्थित देवु शकला नाही व त्याची कागदपत्रेही तो त्यांच्यासमोर सादर करु शकला नाही, त्यामुळे त्याच्याबद्दलचा संशय अधिक बळावल्याने म्हसवड पोलीसांनी त्याच्याकडे कसुन चौकशी केली असता तो मुंबई येथुन रिक्षांची चोरी करीत असल्याची त्याने पोलीसांना कबुली देत या रिक्षा व्यतीरिक्त आणखी २ रिक्षांची आपण चोरी केली असल्याचे तुपे याने पोलीसांना सांगितले.

    ही कारवाई कोणी केली? 

    तुपे याने तीन रिक्षांची सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरल्याची कबुली पोलीसांना दिली आहे. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारी, नंदकुमार खाडे, देवानंद खाडे, शिवाजी जाधव, अमर नारनवर, नितीन निकम, सुरज काकडे, किरण चव्हाण, अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकुळे, सतिष जाधव आदींनी सहभागी होत कारवाई केली.