प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

गांजा विक्री, गो-तस्करी यापाठोपाठ आता देहविक्री व्यवसाय (Prostitution) भंडाऱ्यात फोफावत आहे. अशातच येथील एका देहव्यापार अड्डयावर धाड टाकून 2 महिला व 3 पुरूषांना अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

    भंडारा : गांजा विक्री, गो-तस्करी यापाठोपाठ आता देहविक्री व्यवसाय (Prostitution) भंडाऱ्यात फोफावत आहे. अशातच येथील एका देहव्यापार अड्डयावर धाड टाकून 2 महिला व 3 पुरूषांना अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

    भंडारा शहरातील रमाबाई आंबेडकर वॉर्ड येथील एका घरी देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्या माहितीवरून पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी सापळा रचून धाड टाकली. यात रमाबाई वॉर्डातील 40 वर्षीय महिला स्वतःच्या घरी आर्थिक लाभासाठी महिलांना देहविक्री करण्यासाठी प्रवृत्त करताना आढळून आली. या ठिकाणी देहविक्री करण्याच्या उद्देशाने 2 महिला व शरीरसंबंधाच्या उद्देशाने तीन जण आढळून आले. याप्रकरणी 2 महिला व 3 जणांविरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

    अवैध व्यवसायाचे केंद्र

    भंडारा जिल्ह्यात कधी नव्हे इतके गुन्ह्याचे प्रमाण वाढल्याचे मागील वर्षभरातील नोंदीवरून दिसून येते. रेती घाटांचे लिलाव झाले नसले तरी रेतीचा मोठा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. गांजा विक्री सर्रास सुरू असताना याविरुद्ध कारवाई करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.