ओबीसीच्या मुद्यावरून बावनकुळे-अजित पवारांमध्ये खडाजंगी; बावनकुळे म्हणाले, ‘ओबीसींना न्याय देण्यासाठी फडणवीस मुख्यमंत्री झाले’ तर पवार म्हणतात…

महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता ओबीसीच्या मुद्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात वाकयुद्ध रंगलं.

    मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता ओबीसीच्या मुद्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात वाकयुद्ध रंगलं.

    चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपने ओबीसींवर कधीही अन्याय केला नाही. ओबीसींना न्याय देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनावे लागले, असे म्हटले होते. तसेच मला भाजपने जिल्हा परिषद, विधानसभेवर संधी दिली. अनेकदा मंत्री केले. हा काय माझ्यावर अन्याय झाला का? एवढ्या वेळेस संधी देऊन पक्षाने केवळ एकदा सांगितले की, यंदा तुम्ही विधानसभेची तिकीट लढू नका तर तो अन्याय झाला का? तसेच, त्यानंतर काय झाले, हे तरी आता पाहा. पक्षाने आता मला अध्यक्षपद दिले आहे. पक्षाने माझ्यावर, ओबीसींवर कधीही अन्याय केलेला नाही. त्यांच्या या विधानानंतर अजित पवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

    पंतप्रधान मोदी ओबीसी

    चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढे म्हटले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत. देशाला ओबीसी पंतप्रधान भाजपने दिला आहे. ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा भाजपने दिला आहे. आज केंद्रात 27 ओबीसी मंत्री आहे. भाजपने ओबीसी समाजासाठी केलेले अशी कितीतरी कामे मी सांगू शकतो, असेही म्हटले आहे.

    शिंदे-फडणवीसांनी काय काम केलं? : अजित पवार

    अजित पवार यांनी पुण्यात विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी आमच्याबद्दल चांगलं बोलावे, अशी अपेक्षा का करावी? बावनकुळेंच्या बोलण्याला फारसे महत्त्व देत नाही. आम्ही आमचे काम करत आहोत. मूळात शिंदे-फडणवीस सरकार येऊन त्यांनी तरी ओबीसींसाठी काय काम केलं, आम्हीच ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेत स्थान मिळावे म्हणून कोर्टात गेलो. मग त्यानंतर शिंदे फडवीसांनी निवडणूका तरी का घेतल्या नाहीत, असेही पवार म्हणाले.