आरक्षणामुळे पाचगणीची ‘राजकीय गणितं’ बदलण्याची शक्यता

महाबळेश्वर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखली जाणारी पाचगणी गिरिस्थान नगरपरिषेदच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेनंतर आज आरक्षण सोडती काढण्यात आल्या. या आरक्षणामुळे पाचगणीच्या राजकारणात 'राजकीय गणित' बदलण्याची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

  पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखली जाणारी पाचगणी गिरिस्थान नगरपरिषेदच्या (Panchgani Giristhan Municipal Council) निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेनंतर आज आरक्षण सोडती काढण्यात आल्या. या आरक्षणामुळे पाचगणीच्या राजकारणात ‘राजकीय गणित’ बदलण्याची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

  काहींना आपला पूर्वीचा प्रभाग व हक्काचा विभाग आरक्षणामुळे गमवावा लागला आहे. तर काहींना इतर प्रभागात स्थलांतरित होऊन आपले नशीब आजमावे लागणार आहे. आजच्या सोडतीत सर्वसाधारण पुरुष आठ, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी दोन, अनुसूचित जाती जमाती महिलांसाठी दोन तर सर्वसाधारण महिलांसाठी आठ असे आरक्षण आज जाहीर करण्यात आले.

  पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेनंतर होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे पाचगणीकरांचे लक्ष लागून राहिले होते. आज पालिकेच्या छ्त्रपती शिवाजी सभागृहात या सोडतीसाठी विशेष सभा झाली. यामध्ये सोडती काढण्यात आल्या. पाचगणी पालिकेच्या प्रभागांची आरक्षण सोडत नियंत्रक अधिकारी अर्चना नाष्टे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश पवार उपस्थित होते.

  प्रारंभी ज्या प्रभागात अनुसूचित जाती जमाती लोकसंख्या अधिक आहे, असे प्रभाग अनुसूचित जाती जमातींच्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले. या नियमानुसार प्रभाग ९, ३ ,२ व ८ हे प्रभाग अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले. अनुसूचित जातीच्या महिला व पुरुष यांचे आरक्षण चिठ्ठीद्वारे शालेय चिमुकल्यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यानंतर नियमानुसार आरक्षण जाहीर करण्यात आले.

  प्रभाग एक (अ.. सर्वसाधारण महिला राखीव ब…. सर्वसाधारण), (प्रभाग दोन अ…अनुसूचित जाती महिला राखीव, ब….सर्वसाधारण ), प्रभाग तीन (अ.. अनुसूचित जाती सर्वसाधारण ब…. सर्वसाधारण महिला).
  प्रभाग चार (अ…सर्वसाधारण महिला, ब….सर्वसाधारण), प्रभाग पाच (अ.. सर्वसाधारण महिला, ब…. सर्वसाधारण), प्रभाग ६ (अ.. सर्वसाधारण महिला, ब…. सर्वसाधारण), प्रभाग सात (अ.. सर्वसाधारण महिला, ब…. सर्वसाधारण), प्रभाग आठ (अ..अनुसूचित जाती महिला राखीव, ब…सर्वसाधारण), प्रभाग नऊ (अ..अनुसूचित जाती सर्वसाधारण, ब…सर्वसाधारण महिला), प्रभाग दहा (अ..सर्वसाधारण महिला, ब..सर्वसाधारण).

  या आरक्षणामुळे पाचगणीच्या राजकारणात ‘राजकीय गणित बदलण्याची’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काहींना आपला पूर्वीचा प्रभाग व हक्काचा विभाग आरक्षणामुळे गमवावा लागला आहे. तर काहींना इतर प्रभागात स्थलांतरित होऊन आपले नशीब आजमवावे लागणार आहे. तर पहिल्यांदाच ओबीसी आरक्षण सोडून निवडणूक होत असल्याने ओबीसी इच्छुक नाराज झाले आहेत.

  प्रारंभी ज्या प्रभागात अनुसूचित जाती-जमातींची लोकसंख्या अधिक आहे, असे प्रभाग राखीव ठेवण्यात आले. या नियमानुसार प्रभाग ९, ३ ,२ व ८ हे प्रभाग अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवले.