वाघनखांवरून राजकारण तापले; संजय मंडलिकांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा,  तर हसन मुश्रीफांचा सावध पवित्रा, पाहा यावरील सविस्तर रिपोर्ट

Kolhapur News : आता वाघनखांवरून महाराष्ट्रातील राजकारण तापले असल्याने, वाघनखे केवळ 3 वर्षांसाठी येणार असल्याने आता वाघनखांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झाल्याचे दिसून येत आहे. वाघनख्या केवळ तीन वर्षांसाठी येणार असल्याने तसेच त्या शिवरायांनीच वापरल्या होत्या का? यावरून वादंग निर्माण झाले आहे. काही इतिहास संशोधकांसह आदित्य ठाकरे यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 

  कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी यांनी ज्या वाघनख्यांनी (Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe) अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता त्या महाराष्ट्रात परत आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला रवाना होणार आहेत. वाघनख्या महाराष्ट्रात येत असलेल्या तरी त्या केवळ तीन वर्षांसाठी येणार असल्याने तसेच त्या शिवरायांनीच वापरल्या होत्या का? यावरून वादंग निर्माण झाले आहे. काही इतिहास संशोधकांसह आदित्य ठाकरे यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

  संजय मंडलिकांचा ठाकरे कुटुंबीयांवर निशाणा

  आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर कोल्हापूरचे शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तोफ डागली आहे. आदित्य ठाकरे यांना स्वतःची नखे वाघनखें वाटत असतील, असं म्हणत शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिकांनी पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबीयांना डिवचलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मृतीचिन्ह कोणतेही असेल त्याचे शिवप्रेमी निश्चितच स्वागत करतील. तलवार आणि वाघनखे दोन्ही आणणार आहोत. त्याचे स्वागत महाराष्ट्र करेल, असेही खासदार मंडलिक म्हणाले. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार जी वाघ नखं आणतील ती खरी असतील. आदित्य ठाकरे यांना वाघ नख्यांबद्दल काय माहिती आहे हे मला माहिती नाही, त्यांना स्वत:ची नखं वाघनखं वाटत असावीत, असा टोला संजय मंडलिक यांनी लगावाला. दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांना वाघनखांबद्दल काय माहिती आहे हे मला माहित नाही, अशी टीका मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

  शिवरायांची ही वाघनखे खरी आहेत का? 

  छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे भारतात येणार आहेत, पण ही वाघनखे येण्याआधीच राजकीय वादळ उठले आहे. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांची ही वाघनखे खरी आहेत का? त्यांनी ती खरंच वापरली होती कां? असा सवाल करीत आक्षेप घेतला आहे.

  16 नोव्हेंबरला शिवरायांची वाघनखे मुंबईत येणार

  दरम्यान, येत्या 16 नोव्हेंबरला शिवरायांची वाघनखे मुंबईत आणण्यात येणार आहेत. वाघनखे मुंबईत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या (1 ऑक्टोबर) लंडनला रवाना होणार आहेत. लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयासोबत वाघनखे घेऊन येण्यासाठी 3 ऑक्टोबरला करार करण्यात येणार आहे. पुढील 3 वर्षांसाठी वाघनखे महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांची वाघनखे सध्या लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. ती परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.